Tuesday, April 21, 2020

एक नवीन सुरवात...

नमस्कार मित्रांनो,

    खूप दिवसापासून काही तरी लिहावे असे वाटत होते, पण सुचतच नव्हते नक्की कुठून सुरवात करावी. Finally, आज योग आला तो पण corona मुळे, Generally रोजच्या धावपळीच्या routine मधून काही लिहण्यासाठी वेळच मिळत नाही. असा निवांत वेळ खूप कमी भेटतो म्हणून मी आज तुमच्या सोबत काही गोष्टी share करणार आहे, आशा आहे की त्या तुमच्या आयुष्यात नक्कीच थोडा फार बदल करतील.
 
      सर्वप्रथम ज्या लोकांना मी कोण आहे हे माहीत नाही त्यांना माझी थोडक्यात ओळख करून देतो, मी सुनिल पाटील, मूळ गांव निमणी, शिक्षणाचं म्हणाल तर माझ्या admission च्या वेळी 2च गोष्टी trending ला होत्या. एक म्हणजे Engg. आणि दुसरे doctor, परंतू 3idiots मधल्या dialogue प्रमाणे मुलगा म्हणजे Engg. आणि मुलगी म्हणजे doctor असे समीकरण आमच्या देखील आयुष्या मध्ये होतेच. परंतू पाहुणे आणि मित्र परिवार यांचा सांगण्यावरुन mechanical ही ever-green branch आहे आणि पुढे जाऊन खूप scope येईल. (जे लोक diploma ला Engg. समजतात आणि ज्यांना Engg. केले की परदेशात नोकरी ची संधी भेटते (M.I.D.C.) तेच लोक Engg. च्या admission साठी suggession देत होते)

       Passion, ambitions, dreams.., हे शब्द  बोलण्यासाठीच खूप छान वाटतात, Actual life मध्ये असे शब्द वापरले तर पोरगं बिघडलं किवा track बाहेर गेलं असे समजले जाते. एकंदरीत या सगळ्या गोष्टी तेव्हाच कामाच्या आहेत जेव्हा याचा खरा अर्थ आपल्याला किंवा आपल्या parents ना समजलेला असतो. Engg. म्हणजे खूप सारा पैसा आणि well settled life. खरं तर या गोष्टी मी पण मान्य करतो की आयुष्यात या गोष्टी तेवढ्याच important आहेत. परंतु या गोष्टी मिळवल्या नंतर हवे असणारे peace of mind हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. आज corona सारख्या भयानक रोगाचा आपण सामना करत आहोत, मोठ मोठ्या देशांनी सुद्धा या समोर हात टेकले आहेत. अश्या वेळी सर्वांना संशोधक आठवत आहेत.
 
     आयुष्यात जसे बालपण हे एकदाच येते तसे तारुण्य हे देखील एकदाच येते. त्यामुळे आपण ज्या गोष्टी करण्यासाठी वेळ देतो आहोत ते नक्कीच एकदा विचार करून करावे असे मला वाटते.
होय.! मी त्या बद्दलच बोलतोय आजची तरुण पिढी ज्या प्रवाहामध्ये चालली आहे हे पाहून आपण कुठे तरी हरवत चाललो आहे असे वाटते. लहानपणापासून आपल्यावरती जे संस्कार झाले आहेत ते फक्त formality म्हणून किंवा पाहुणे मंडळी ना हे सांगण्यासाठी राहिले आहेत कि आमचा मुलगा/मुलगी निर्व्यसनी आहे. याबद्दल फारसं सविस्तर बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही कारण हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. फक्त या गोष्टी ची आठवण करून देऊ इच्छितो की आपण जे करता आहात त्याचा इतरांवरती काही परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. आपण जरी आपल्या शोना-बाबू चे hero असलो तरी आपल्या आई वडिलांसाठी तेवढेच महत्त्वाचे आहात.
 
    अनुभव, ही एक अशी गोष्ट आहे की ती फक्त प्रयत्न करणाऱ्यालाच मिळते. असे म्हणतात कि "प्रयत्नांती परमेश्वर" पण हे आपण असे ही म्हणू शकतो की ज्या लोकांना already परमेश्वर भेटला आहे त्यांचे दर्शन आपण का घ्यायला नको, प्रत्येक वेळेला स्वतःची केस पांढरे होण्याची वाट कशाला बघायची. दुसऱ्याच्या अनुभवातून माणूस खूप काही शिकू शकतो. असेच काहीसे माझ्या Engg. life मध्ये घडत गेले. यामधूनच passion, ambitions, dreams.., याचा खरा अर्थ समजत गेला. Engg. करून job करायचा असं असणारे ध्येय आता थोडेफार चढत्या क्रमाला लागलं होते.

   "Simple living, high thinking"
या thought प्रमाणे माझ्या आयुष्यात खूप काही बदल होत गेले. एक साधा middle class कुटुंबातील मुलगा खुप काही मोठं करायची स्वप्ने बघत होता. परंतु मोठ्याची सुरवात ही छोट्या छोट्या गोष्टी पासून च होते याची मला जाणीव आहे म्हणूनच हा छोटासा blog लिहण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्ही शेवट पर्यंत मन लावून वाचल्या बद्दल तुमचे मनापासून आभार. आशा आहे भविष्यात तुमचा असाच प्रतिसाद प्रत्येक blog साठी राहील आणि असाच सवांद या माध्यमातून तुमच्याशी होत राहील. भेटुयात पुढच्या blog मध्ये असेच काही तरी खास घेऊन.

धन्यवाद !!!

No comments:

Post a Comment